लोणावळा शहरात कोरोना बधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. शहरातील प्रत्येक विभागात रोजच्या रोज नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. आज बुधवारी देखील शहरातील विविध भागातून तब्बल १६ नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून एकाच दिवसात १६ रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे आता शहरातील एकूण बाधित रुग्णसंख्या २२४ इतकी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तुंगार्ली येथील एक, न्यू तुंगार्ली येथील एक, पांगोळी येथील एक, लोणावळा बाजारपेठ येथील एक, इंद्रायणी नगर येथील एक, खंडाळा येथील दोन, भांगरवाडी येथील तीन आणि लोणावळा गावठाण भागात एकाच घरातील सहा अशा एकूण १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
वरील १६ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लालको कॉटेज, न्यू तुंगार्ली येथील ६१ वर्षीय व्यक्ती, तुंगार्ली गावातील ७० वर्षीय व्यक्ती, पांगोळी गावातील ६४ वर्षीय महिला, भांगरवाडी येथील एक ५५ वर्षीय महिला व एक ५६ वर्षीय व्यक्ती तसेच श्री आंगण सोसायटी, भांगरवाडी येथील एक ६० वर्षीय व्यक्ती, इंद्रायणी नगर येथील ५९ वर्षीय महिला, रोहिदास वाडा, खंडाळा येथील ५० वर्षीय व्यक्ती, खंडाळा गावठाण येथील ४४ वर्षीय व्यक्ती, ओसवाल गल्ली, लोणावळा येथील ५४ वर्षीय महिला आणि गावठाण विभागातील एक ६२ वर्षीय व्यक्ती, एक २९ वर्षीय युवक आणि अनुक्रमे ९० वर्षीय, ६२ वर्षीय ५१ वर्षीय आणि २२ वर्षीय आशा चार महिलांचा समावेश आहे.
लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता २२४ झाली आहे तर आतापर्यंत १२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या नागरिकांची संख्या ८ असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ९३ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०६)
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment