लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 6 August 2020

करोना संसर्ग ठेवा दूर ; आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे घरगुती उपाय


करोना संसर्ग सारख्या रोगांशी लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं आवश्यक आहे. आणि ही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात काही सामान्य पद्धती सुचवण्यात आल्या आहेत, ज्यांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात सहजरित्या समावेश करू शकतो. जेणेकरून अनेक जीवघेण्या आजारांपासून आपणाला स्वतःचा बचाव करण्यास मदत मिळले.

🔳 गरम पाणी प्या

दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्या. साध्या पाण्याऐवजी गरमच पाणी प्यावे.

🔳 योगासनं करा

दिवसभरात कधीही कमीत कमी 30 मिनिटांसाठी योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करणे आवश्यक आहे.

🔳 गरम मसाले वापरा

हळद, जीरे, धने, लसूण यांचा स्वयंपाकामध्ये अवश्य समावेश करा.

🔳 च्यवनप्राशचे सेवन करा

दररोज एक चमचा च्यवनप्राशचं सेवन करून दिवसाची सुरुवात करा. मधुमेहाचा त्रास असल्यास शुगर फ्री च्यवनप्राशचे सेवन करावे.

🔳 हळद घातलेलं दूध प्या

१५० मिलिलीटर दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून तयार झालेले हळदीचं दूध दिवसातून एक किंवा दोन वेळा प्या. हळदी दूध पिण्यापूर्वी किंवा प्यायल्यानंतर लगेचच कोणताही पदार्थ खाण्याची चूक करू नका.

🔳 हर्बल टी किंवा काढा प्या

हर्बल टी किंवा औषधी काढ्याचं सेवन करा. यासाठी तुळस, दालचिनी, काळी मिरी, आले आणि मनुका एकत्रितरित्या पाण्यामध्ये उकळा. हे मिश्रण नीट उकळल्यानंतर एका ग्लासमध्ये गाळून घ्या. दिवसभरात या काढ्याचं तुम्ही एक किंवा दोन वेळा सेवन करू शकता. काढ्याची चव अतिशय तिखट वाटल्यास यामध्ये तुम्ही गुळ किंवा लिंबूच्या रसाचा समावेश करू शकता.

🔳 गरम पाण्याची वाफ घ्या

पुदिन्याची पाने आणि ओवा एकत्रितरित्या पाण्यामध्ये उकळा. या पाण्यानं वाफ घ्या. यामुळे खोकला-सर्दीचा त्रास कमी होईल. कफ किंवा घशामध्ये तीव्र वेदना होत असल्यास लवंग पावडर, मध किंवा साखर असे मिश्रण तयार करा आणि दिवसातून दोन किंवा तीन वेळा या मिश्रणाचे सेवन करा.

या गोष्टी लक्षात ठेवा

करोना व्हायरसवरील उपाय म्हणून या औषधोपचार प्रक्रियांकडे पाहू नका. या उपचारानंतरही तुम्हाला आराम मिळत नसेल किंवा श्वसनासंबंधीचे कोणतेही तीव्र स्वरुपातील त्रास जाणवू लागल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

(सर्व माहिती संग्रहित)



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages