लोणावळा येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या कोरोना वारीयर्स पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे लोणावळा शहरात आता कोरोना बधितांची संख्या ९२ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर पोलीस कर्मचाऱ्याचे वय २८ वर्ष असून पोलीस लाईन, तुंगार्ली येथील रहिवासी आहे. कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी गुरुवारी घेण्यात आलेल्या ७ जणांच्या स्वॅब चे अहवाल आज शुक्रवारी प्राप्त झाले आहे. त्यातील केवळ एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून उर्वरित सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज शुक्रवारी आढळलेल्या रुग्णामुळे लोणावळा शहरातील एकूण रुग्णसंख्या ९२ झाली आहे. यापैकी ३८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून सक्रिय रुग्णसंख्या ५० इतकी झाली आहे. आतापर्यत शहरातील ४ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
तुंगार्ली - ०४【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०४】
पांगोळी, वलवण - ११【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०६】
नांगरगाव - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】
भांगरवाडी - २१【बरे झालेले रुग्ण - १० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】
नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड - ०५【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०४】
रेल्वे विभाग, बारा बंगला - ०६【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०४】
गवळीवाडा - ०९【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०६】
खंडाळा - १४【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०९】
जुना खंडाळा, रायवूड - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】
लोणावळा गावठाण, बाजारपेठ - १०【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०४】
सह्याद्री नगर, हुडको - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】

No comments:
Post a Comment