लोणावळा शहरातील विविध भागातून आज शनिवारी तब्बल १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात रॅपिड अँटीजण टेस्ट द्वारे तपासणी करण्यात आलेल्या ७ जणांचा समावेश आहे. शिवाय मागील २४ तासात शहरातील दोन कोरोना बधित रुग्णांचा मृत्यू देखील झाला असल्याने आजचा शनिवारचा दिवस लोणावळेकरांसाठी धक्कादायक बातमी देणारा आणि दुर्दैवी असा ठरला आहे. लोणावळा शहरातील एकूण बधितांच्या संख्येने आता २५० चा आकडा पार केला असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा शहराच्या विविध भागातील आणि त्यातही विशेषतः खंडाळा विभागातील अनेक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. खंडाळा विभागातील ८, गवळीवाडा विभागातील २, तुंगार्ली विभागातील एक, नांगरगाव येथील एक आणि सिद्धार्थ नगर येथील एकाचा यात समावेश आहे. या १३ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ६ महिला आणि ७ पुरुष रुग्ण समाविष्ट आहेत.
लोणावळा शहरातील गवळीवाडा आणि भांगरवाडी येथील प्रत्येकी एक कोरोना बधिताचा मागील २४ तासात मृत्यू झाला आहे. गवळीवाडा येथील ५६ वर्षीय व्यक्ती तर भांगरवाडी येथील ६६ वर्षीय महिलेचा यात समावेश आहे. यामुळे लोणावळा शहरात आतापर्यंत कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १४ झाली आहे. याशिवाय कोरोना वर मात करून बऱ्या झालेल्या ६ जणांना आज हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.
लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता २५५ झाली आहे तर आतापर्यंत १३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या नागरिकांची संख्या १४ असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या १०३ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०६)
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment