लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 29 August 2020

लोणावळा शहरात अजून पाच कोरोना पॉझिटिव्ह; शनिवारी दिवसभरात १८ पॉझिटिव्ह रुग्ण

लोणावळा शहरात आज शनिवारी उशिरा अजून ५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तत्पूर्वी आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आज शनिवारी एकाच दिवशी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या एकूण रुग्णांची संख्या १८ झाली आहे. शहरात एकाच दिवसात पॉझिटिव्ह आलेली ही उच्चांकी रुग्णसंख्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ठोंबरेवाडी येथील एक ५६ वर्षीय व्यक्ती, हुडको येथील एक ३७ वर्षीय व्यक्ती आणि भांगरवाडी येथील एक ३२ वर्षीय व्यक्ती आणि अनुक्रमे १८ व ३० वर्षीय अशा दोन महिलांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे स्वॅब खाजगी लॅब मधून चाचणी साठी घेण्यात आले होते. 

लोणावळा शहरात आता कोरोना बधितांची एकूण संख्या २६० झाली आहे तर आतापर्यंत १३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या नागरिकांची संख्या १४ असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या १०८ इतकी आहे.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०६)
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages