लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 12 August 2020

लोणावळा शहरात दोन जेष्ठांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; एकूण संख्या १३८

लोणावळा येथील तुंगार्ली आणि इंद्रायणी नगर या विभागातील दोन जेष्ठांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता १३८ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तुंगार्ली विभागातील गुरुकुल विद्यायलाच्या जवळच्या रहिवासी असणाऱ्या एका ७२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, तर इंद्रायणी नगर येथील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर दोन्हीही अहवाल खाजगी रुग्णालयातून प्राप्त झाले आहे. याशिवाय कोविड केअर सेन्टर, लोणावळा याठिकाणी मंगळवारी ५ जणांचे स्वॅब कोरोना चाचणी साठी घेण्यात आले होते, त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १३८ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ७५ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ५ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०७【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०६】 

पांगोळी, वलवण  - २३【बरे झालेले रुग्ण - ०७ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १५】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - २६【बरे झालेले रुग्ण - १५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - १०【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०७】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ००】

गवळीवाडा  - १२【बरे झालेले रुग्ण - ०३ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०७】

खंडाळा  - १८【बरे झालेले रुग्ण - ०८ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - १०】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - २१【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - १५】

सह्याद्री नगर, हुडको - ०३【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०३】

भुशी, रामनगर - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages