लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 4 August 2020

भांगरवाडी मध्ये अजून एक महिला पॉझिटिव्ह; लोणावळा शहरात आज आठवा पॉझिटिव्ह रुग्ण

लोणावळा शहरात आजचा मंगळवारचा दिवस उच्चांकी करोना बधित रुग्णसंख्या नोंदवणारा दिवस ठरला आहे. आज दिवसभरात लोणावळा शहरात एकूण आठ रुग्ण करोना बाधित आढळून आले असून, आजचा आठवा भांगरवाडी विभागातील एक ५६ वर्षीय महिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, लोणावळा याठिकाणी या महिलेचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्या चाचणीचा अहवाल आज मंगळवारी उशिरा प्राप्त झाले. भांगरवाडी विभागात आता करोना बधितांची एकूण संख्या १९ इतकी झाली आहे. तर लोणावळा शहरातील एकूण रुग्णसंख्या ७८ झाली आहे. यापैकी आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३८ आहे, तर सक्रिय रुग्णसंख्या ३६ इतकी झाली आहे. याशिवाय चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०२】 

पांगोळी, वलवण  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०१】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - १९【बरे झालेले रुग्ण - १० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०९】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०४】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०४】

गवळीवाडा  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०६】

खंडाळा  - ११【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०६】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०३】


ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages