लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 4 August 2020

भांगरवाडी, लोणावळा येथे आणखी दोन पॉझिटिव्ह; शहरात आज ७ पॉझिटिव्ह, एकूण करोना बधितांची संख्या ७७

लोणावळा शहरातील भांगरवाडी विभागात आज मंगळवारी आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरात आज मंगळवारी करोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ७ झाली आहे. तर एकूण करोना बाधित रुग्णसंख्या ७७ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भांगरवाडी विभागातील श्री स्वामी समर्थ साई हिल याठिकाणीच्या एका ९१ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा तसेच रचना गार्डन येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे भांगरवाडी येथील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १८ झाली आहे.

लोणावळा शहरातील एकूण रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. यापैकी आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३८ आहे, तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३५ इतकी झाली आहे. याशिवाय चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०२】 

पांगोळी, वलवण  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०१】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - १८【बरे झालेले रुग्ण - १० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०६】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०३】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०४】

गवळीवाडा  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०६】

खंडाळा  - ११【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०५】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】


ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages