लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 4 August 2020

लोणावळा शहरात करोना बधितांच्या संख्येने गाठले पाऊण शतक; लोणावळा शहरात तीन तर ग्रामीण भागातील एक रुग्ण

लोणावळा शहरातील प्रधान पार्क सोसायटी, सिद्धार्थ नगर आणि खंडाळा या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्णाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लोणावळा शहरात आज एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे. तर शहरातील एकूण रुग्ण संख्येने पाऊण शतक गाठले असून रुग्णसंख्या आता ७५ झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार प्रधान पार्क सोसायटीमधील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या महिलेचे वय ६६ असून केळपेठ, खंडाळा येथील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या महिलेचे वय ५० वर्ष आहे. याशिवाय सिद्धार्थ नगर, 'ई' वॉर्ड येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे वय ६२ वर्ष आहे. या तिघांचेही स्वॅब करोना चाचणी साठी कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी घेण्यात आले होते. याशिवाय याच ठिकाणी घेण्यात आलेल्या चाचणी मध्ये करंडोली (ता.मावळ) येथील एक ३४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.

लोणावळा शहरातील एकूण रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. यापैकी आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३८ आहे, तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३ इतकी झाली आहे. याशिवाय चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०२】 

पांगोळी, वलवण  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०१】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - १६【बरे झालेले रुग्ण - १० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०६】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०३】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०४】

गवळीवाडा  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०६】

खंडाळा  - ११【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०५】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】


ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages