अयोध्येतील राममंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्याचा क्षण भारतीय जनता पार्टी, लोणावळा मंडलाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुमित्रा हॉल, भांगरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रामचंद्राचा जयजयकार करण्यात आला. तसेच याठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. कार्यक्रमाच्या दरम्यान भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याशिवाय १९९२ साली अयोध्येला कारसेवेकरीता गेलेल्या कारसेवकांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी यावेळी बोलताना, आजचा दिवस हा संस्मरणीय असुन, लाखों कारसेवकानी केलेल्या सेवेचे है फळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या महापुरुषांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे याचा मोठा आनंद असल्याचे सांगितले. याप्रसंगी भाजप लोणावळा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक देवीदास कडू, मिलिंद खळदकर, नगरसेविका मंदा सोनवणे, अरविंद कुलकर्णी, सुनील तावरे, रूपेश नांदवटे, शुभम मानकामे, कमलेश सैगर, सुनील बोके, हेमंत कांबळे, संतोश शिंत्रे, समीर इंगळे, दीपक विकारी राजू परदेशी, गिरीश मुथा, दिलीप गुप्ता, सुजाता मेहता, योगिता कोकरे, छाया भवारी, विजया वाळंज, शिल्पा चिकणे, श्वेता राऊत, पार्वती रावळ, नीता मानकामे, नेहा पालकर, शारदा गायकवाड आदींसह अनेक मान्यवर आणि पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने भांगरवाडी येथील श्रीराम मंदिर येथे सजावट करण्यात आली होती. त्याठिकाणी पणत्या ठेवण्यात आल्या तसेच प्रसादाचे वाटप देखील करण्यात आले.

No comments:
Post a Comment