लोणावळा येथील भांगरवाडी आणि सह्याद्री नगर, हुडको येथील दोन जणांचा करोना चाचणी अहवाल आज गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता लोणावळा शहरातील एकूण करोना बाधित रुग्णसंख्या ८९ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी बुधवारी घेण्यात आलेल्या ९ जणांच्या स्वॅब पैकी तीन जणांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यातील दोन जण लोणावळा शहरातील असून एक जण देवघर येथील आहे. लोणावळा शहरातील सह्याद्री नगर, हुडको येथील एका ५५ वर्षीय महिलेचा तर भांगरवाडी येथील एका ७१ वर्षीय व्यक्तीचा समावेश आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आहे. याशिवाय देवघर येथील एका २९ वर्षीय युवकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.

No comments:
Post a Comment