लोणावळा शहरातील तुंगार्ली विभागात बद्री विशाल सोसायटी जवळ राहणाऱ्या एक ३८ वार्षिक व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल आज गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. हा आज गुरुवारच्या दिवसात आढळलेला तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण असून लोणावळा शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या आता ९० झाली आहे.
गुरुवारी आढळलेल्या रुग्णामुळे लोणावळा शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ९० झाली आहे. यापैकी आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३८ आहे, तर सक्रिय रुग्णसंख्या ४८ इतकी झाली आहे. याशिवाय ४ रुग्णांचा करोना मुळे मृत्यू झाला आहे.
लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
तुंगार्ली - ०३【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०३】
पांगोळी, वलवण - ११【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०६】
नांगरगाव - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】
भांगरवाडी - २१【बरे झालेले रुग्ण - १० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】
नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड - ०५【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०४】
रेल्वे विभाग, बारा बंगला - ०६【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०४】
गवळीवाडा - ०९【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०६】
खंडाळा - १४【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०९】
जुना खंडाळा, रायवूड - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】
लोणावळा गावठाण, बाजारपेठ - ०९【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०३】
सह्याद्री नगर, हुडको - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】

No comments:
Post a Comment