लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 27 August 2020

लोणावळा शहरात जेष्ठ व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

लोणावळा येथील एक ७७ वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा कोरोना मुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मागील तीन दिवसात शहरातील कोरोना मुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे. याशिवाय मागील चार ते पाच दिवसांपूर्वी खंडाळा येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा देखील कोरोना मुळे मृत्यू झाल्याची माहिती नगरपरिषदेकडे प्राप्त झाली असून त्यामुळे लोणावळा शहरातील आतापर्यंत मृत झालेल्या एकूण बधितांची संख्या १२ झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार प्रधान पार्क येथील रहिवासी असलेल्या जेष्ठ व्यक्तीला ७ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर सोमटणे फाटा येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तर खंडाळा बाजारपेठ विभागात राहणाऱ्या मृत व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल २९ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. तद्नंतर त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०६)
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages