लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 27 August 2020

लोणावळा शहरात आज पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

लोणावळा शहरातील खंडाळा, बारा बांगला, भांगरवाडी, सिद्धार्थ नगर आणि लोणावळा बाजार या विभागातून मिळून एकूण पाच व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल आज गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २२९ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार निसर्ग नगरी, लोणावळा येथील एका ४६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांची चाचणी कोविड केअर सेन्टर, झालावाडी याठिकाणी घेण्यात आली होती तर खंडाळा येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांची चाचणी खाजगी लॅब मध्ये घेण्यात आली होती. याशिवाय कोविड केअर सेन्टर, झालावाडी याठिकाणी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन चाचणी मध्ये बारा बंगला येथील ४९ वर्षीय व्यक्ती, भांगरवाडी येथील ४८ वर्षीय व्यक्ती आणि सिद्धार्थ नगर येथील ४० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता २२९ झाली आहे तर आतापर्यंत १२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या नागरिकांची संख्या १० असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ९६ इतकी आहे.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०६)
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages