लोणावळा येथील खंडाळा विभागातील केळपेठेत एका ४९ वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल आज सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. आज सकाळीच खंडाळा विभागातील एका ५१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आजच्या दिवसातील खंडाळा विभागात करोना पॉझिटिव्ह आलेला हा दुसरा रुग्ण आहे.
लोणावळा शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता ७० झाली आहे. यापैकी आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३५ आहे, तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३१ इतकी झाली आहे. याशिवाय चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
गवळीवाडा - ९【बरे झालेले रुग्ण - १ / मृत्यू - २】
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी - ४【बरे झालेले रुग्ण - २ / मृत्यू - ०】
भांगरवाडी - १६【बरे झालेले रुग्ण - ८ / मृत्यू - ०】
नांगरगाव - ६【बरे झालेले रुग्ण - ६ / मृत्यू - ०】
खंडाळा (खंडाळा + जुना खंडाळा) - १३【बरे झालेले रुग्ण - ९ / मृत्यू - ०】
वलवण - २ 【बरे झालेले रुग्ण - १ / मृत्यू -१】
टेबल लँड, लोणावळा गावठाण, बाजारपेठ - १२【बरे झालेले रुग्ण - ७ / मृत्यू - ०】
रेल्वे विभाग - ६【बरे झालेले रुग्ण - १ / मृत्यू -१】
तुंगार्ली - २【बरे झालेले रुग्ण - ० / मृत्यू - ०】

No comments:
Post a Comment