लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 19 August 2020

रामनगर आणि खंडाळा येथे नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; शहरातील कोरोना बधितांची संख्या १६७


लोणावळा येथील रामनगर आणि खंडाळा या विभागात प्रत्येकी एक आशा दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दोन रुग्णांमुळे आज बुधवारी शहरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ८ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केळपेठ खंडाळा येथील ३६ वर्षीय व्यक्ती आणि रामनगर येथील ५७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल खाजगी रुग्णालयातून प्राप्त झाला असून ते अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १६७ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०३ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ५७ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ७ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

न्यू तुंगार्ली   - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】 

तुंगार्ली  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०२】 

पांगोळी, वलवण  - २५【बरे झालेले रुग्ण - २० / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०४】

नांगरगाव  - ०७【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ०१】

भांगरवाडी  - ३०【बरे झालेले रुग्ण - २० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - १०】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - १८【बरे झालेले रुग्ण - ०७ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १०】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०७【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०१】

गवळीवाडा  - १४【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०७】

खंडाळा  - २२【बरे झालेले रुग्ण - १४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०८】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ००】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - २४【बरे झालेले रुग्ण - १४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०९】

सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】

भुशी, रामनगर - ०३【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०३】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages