लोणावळा येथील इंद्रायणी नगर, वर्धमान सोसायटी, कालेकर मळा आणि गवळीवाडा येथे प्रत्येकी एक आशा चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी आज सकाळी इंद्रायणी नगर आणि आगवाली चाळ येथील प्रत्येकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आलेल्या या चार रुग्णांमुळे लोणावळा शहरात आज बुधवार पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ६ तर आतापर्यंत शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १६५ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंद्रायणी नगर येथील ७० वर्षीय पुरुष, वर्धमान सोसायटी मधील ५३ वर्षीय पुरुष, कालेकर मळा येथील एक महिला (वय अंदाजे २५ वर्ष) तर गवळीवाडा येथील एक ३० वर्षीय युवक अशा चार जणांचे अहवाल खाजगी रुग्णालयातून प्राप्त झाले असून ते पॉझिटिव्ह आले आहे.
बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १६५ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०३ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ५५ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ७ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

No comments:
Post a Comment