लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 18 August 2020

लोणावळा शहरात आणखी दोन नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; शहरातील कोरोना बधितांची संख्या १६१

लोणावळा येथील इंद्रायणी नगर आणि आगवाली चाळ येथील प्रत्येकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लोणावळा शहरात आज बुधवार पर्यंत कोरोना बधितांची संख्या १६१ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी मंगळवारी १३ जणांचे स्वॅब कोरोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्यातील १० जणांचा अहवाल निगेटिव्ह तर ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉजिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये इंद्रायणी नगर येथील ६४ वर्षीय महिलेचा तर आगवाली चाळ येथील ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय तिसरा पॉझिटिव्ह व्यक्ती हा कुरवंडे येथील ५३ वर्षीय पुरुष आहे.

बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १६१ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०३ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ५१ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ७ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages