लोणावळा येथील नांगरगाव विभागातील एक ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १५५ झाली आहे. याशिवाय आज मंगळवारी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका २७ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल देखिल पॉझिटिव्ह आला असून सदर कर्मचारी हा ओळकाईवाडी येथील दाभाडे मंगल कार्यालया जवळील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा शहरातील ११ जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे शहरातील एकूण कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या १०३ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील सक्रिय कोरोना बधितांची रुग्णसंख्या आता ४५ इतकी झाली आहे.
लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
न्यू तुंगार्ली - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】
तुंगार्ली - ०९【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०२】
पांगोळी, वलवण - २४【बरे झालेले रुग्ण - २० / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०३】
नांगरगाव - ०७【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ०१】
भांगरवाडी - २८【बरे झालेले रुग्ण - २० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०८】
नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड - १४【बरे झालेले रुग्ण - ०७ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०६】
रेल्वे विभाग, बारा बंगला - ०६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ००】
गवळीवाडा - १३【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०६】
खंडाळा - २१【बरे झालेले रुग्ण - १४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०७】
जुना खंडाळा, रायवूड - ०५【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ००】
लोणावळा गावठाण, बाजारपेठ - २४【बरे झालेले रुग्ण - १४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०९】
सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】
भुशी, रामनगर - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】

No comments:
Post a Comment