लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 18 August 2020

रामनगर, वर्धमान सोसायटी आणि भांगरवाडी येथे प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह; शहरातील एकूण बधितांची संख्या १५८


लोणावळा येथील रामनगर, वर्धमान सोसायटी आणि भांगरवाडी विभागातील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल आज मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. आज सकाळीच नांगरगाव येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ४ तर शहरातील आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५८ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रामनगर येथील ६५ वर्षीय जेष्ठ महिलेचा, वर्धमान सोसायटी येथील ३० वर्षीय आणि भांगरवाडी येथील २५ वर्षीय युवक आशा तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वर्धमान सोसायटीमधील बाधित युवक हा ८ जुलै पासून पुणे याठिकाणी राहण्यास असून केवळ त्याचा पत्ता लोणावळा शहरातील असल्याने संबंधित युवकाची नोंद लोणावळा शहरात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय आज कोरोनामुक्त झालेल्या ११ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या वरील चार रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १५८ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०३ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ४८ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ७ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

न्यू तुंगार्ली   - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】 

तुंगार्ली  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०२】 

पांगोळी, वलवण  - २४【बरे झालेले रुग्ण - २० / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०३】

नांगरगाव  - ०७【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ०१】

भांगरवाडी  - २९【बरे झालेले रुग्ण - २० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०९】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - १५【बरे झालेले रुग्ण - ०७ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०७】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ००】

गवळीवाडा  - १३【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०६】

खंडाळा  - २१【बरे झालेले रुग्ण - १४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०७】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ००】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - २४【बरे झालेले रुग्ण - १४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०९】

सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】

भुशी, रामनगर - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages