लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 30 August 2020

नांगरगावात तीन तर ठोंबरेवाडी आणि खंडाळ्यात प्रत्येकी एक कोरोना बाधित; बधितांची एकूण संख्या २७२

लोणावळा शहरातील नांगरगाव, ठोंबरेवाडी आणि खंडाळा विभागातील एकूण पाच जणांच्या रॅपिड अँटीजण चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे शहरात आज रविवारी एका दिवसात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या १२ झाली आहे. याशिवाय कोरोनावर मात करून बऱ्या झालेल्या दोन जणांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजण चाचणीमध्ये नांगरगाव विभागात प्रत्येकी २४ वर्षीय दोन आणि एक १८ वर्षीय असे एकूण तीन युवक, ठोंबरेवाडी येथील ५२ वर्षीय महिला आणि खंडाळा येथील ६० वर्षीय महिला अशा एकूण पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

लोणावळा शहरात आतापर्यंत कोरोना बधितांची एकूण संख्या २७२ झाली आहे तर आतापर्यंत १४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या नागरिकांची संख्या १४ असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ११८ इतकी आहे.


व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०६)
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages