लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 31 August 2020

लोणावळा शहरात सोमवारी उच्चांकी २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

लोणावळा शहरातील विविध भागातून सोमवारी २० नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता २९२ झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार भांगरवाडी विभागात ८, 'डी' वॉर्ड बाजारपेठ विभागात ३, द्वारकामाई 'जी' वॉर्ड येथे २, खंडाळा विभागात ३ तर गावठाण (लोणावळा), नक्षत्र सोसायटी (नांगरगाव), लोणावळा रेल्वे स्टेशन परिसर (रेल्वे विभाग) आणि लखाणी पार्क (न्यू तुंगार्ली) येथे प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

लोणावळा शहरात आतापर्यंत कोरोना बधितांची एकूण संख्या २९२ झाली आहे तर आतापर्यंत १४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या नागरिकांची संख्या १४ असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या १३८ इतकी आहे.



व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०६)
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages