लोणावळा शहरात आज मंगळवारी विविध विभागातील एकूण १७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बधितांच्या संख्येने त्रिशतक पार केले असून शहरात आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या ३०९ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, झालावाडी लोणावळा येथे मंगळवारी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजण चाचणी मध्ये लोणावळा शहरातील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर खाजगी लॅब मार्फत घेण्यात आलेल्या स्वॅब चाचणी मध्ये ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
रॅपिड अँटीजण चाचणी मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रेल्वे कॉलनी येथील एक ४० वर्षीय पुरुष, 'जी' वॉर्ड येथील एक ३२ व एक ५२ वर्षीय असे दोन पुरुष आणि एक २७ व एक ५५ वर्षीयअशा दोन महिला, तुंगार्ली येथील एक २० वर्षीय व एक ४५ वर्षीय अशा दोन महिला, भांगरवाडी येथील एक ४५ वर्षीय पुरुष व एक ३७ आणि एक ५० वर्षीय महिला तसेच एक १४ वर्षीय मुलगी असे एकूण ११ जणांचा समावेश आहे. तर खाजगी लॅब मधून प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालात हुडको येथील ७१ वर्षीय महिला, हॉटेल गौतम परिसर रेल्वे विभागातील एक ५६ वर्षीय पुरुष, इंदिरा नगर जुना खंडाळा येथील २६ वर्षीय महिला यासोबतच एक ७६ वर्षीय महिला, एक ५५ वर्षीय महिला व अन्य एक महिला (या तिघींचा पत्ता समजला नाही) अशा एकूण ६ जणांचा सहभाग आहे.
लोणावळा शहरात आतापर्यंत कोरोना बधितांची एकूण संख्या ३०९ झाली आहे तर आतापर्यंत १४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या नागरिकांची संख्या १४ असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या १५५ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०६)
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👍👍👍
ReplyDelete