लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 8 August 2020

लोणावळेकरांनो सावधान, शहरात उच्चांकी १३ कोरोना बाधित रुग्ण; वलवण मध्ये चार तर पंचशील नगर भुशी येथे एक नवा रुग्ण

लोणावळा येथील वलवण येथे ४ तर आणि पंचशील नगर, भुशी येथे १ नवा रुग्ण आढळून आल्याने लोणावळा शहरात आज शनिवारी एकाच दिवसात उच्चांकी अशा १३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून रोज आढळून येणाऱ्या करोना बधितांची संख्येचा आलेख सातत्याने वाढत आहे, त्यामुळे लोणावळेकरांनी यापुढे जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

आज शनिवारी संध्याकाळपर्यंत लोणावळा शहरात ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. मात्र त्यानंतर मागील काही वेळेत अजून ५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ही संख्या १३ वर पोचली आहे. नव्याने पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये वलवण येथील एक २७ वर्षीय, दुसरा ३२ वर्षीय, तिसरा ३५ वर्षीय तर चौथा ३३ वर्षीय अशा चार व्यक्तीचा आणि पंचशील नगर, भुशी येथील एका ६५ वर्षीय जेष्ठ महिलेचा समावेश आहे. यामुळे लोणावळा शहरात आता एकूण बधितांची संख्या ११५ झाली आहे. 



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages