लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 8 August 2020

लोणावळा शहरातील एकूण बधितांची संख्या ११०; प्रधान पार्क येथील जेष्ठ महिलेला कोरोनाची लागण


लोणावळा येथील प्रधान पार्क सोसायटीमध्ये आज एका जेष्ठ महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणावळा शहरात आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ८ झाली आहे. याशिवाय लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधित रुग्णांची संख्या ११० झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह आलेल्या महिलेचे वय ७२ वर्ष असून या महिलेचे पती आणि मुलगा यांचा अहवाल या आधीच पॉझिटिव्ह आलेला आहे. दुसरीकडे भांगरवाडी विभागातील दोन रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४४ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ६२ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ४ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०४】 

पांगोळी, वलवण  - १७【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १२】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - २३【बरे झालेले रुग्ण - १२ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०८】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०३ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०२】

गवळीवाडा  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०५】

खंडाळा  - १६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - १२【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०६】

सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages