लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 7 August 2020

लोणावळ्यात आज सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; शहरातील एकूण बधितांची संख्या १०९


लोणावळा येथील सिद्धार्थ नगर, प्रधान पार्क, सह्याद्री नगर हुडको, नेताजी वाडी खंडाळा आणि भांगरवाडी या भागातून आज शनिवारी सात जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे आता लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १०९ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी शुक्रवारी १५ जणांचे स्वॅब कोरोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्याचे अहवाल आज शनिवारी प्राप्त झाले असून त्यात ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये सिद्धार्थ नगर येथील दोन ५० वर्षीय महिला तर तिसरी ७० वर्षीय महिला आशा तिघींचा, प्रधान पार्क येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा, सह्याद्री नगर हुडको येथील ६५ वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा तर नेताजी वाडी, खंडाळा येथील एका ३९ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय भांगरवाडी येथील एका ३७ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला असून त्याची चाचणी खाजगी रुग्णालयात घेण्यात आली होती.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १०९ झाली आहे. यातील तुंगार्ली आणि बारा बंगला विभागातील दोन जण बरे झाल्याने त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४४ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ६१ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ४ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०४】 

पांगोळी, वलवण  - १७【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १२】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - २३【बरे झालेले रुग्ण - १२ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - ०८【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०७】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०३ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०२】

गवळीवाडा  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०५】

खंडाळा  - १६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - १२【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०६】

सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages