लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 7 August 2020

लोणावळ्यातील कोरोना बधितांची संख्या १००च्या पार; तुंगार्ली, भांगरवाडी आणि खंडाळ्यात नवे रुग्ण

लोणावळा शहरात आजचा शुक्रवारचा दिवस आतापर्यंतचा उच्चांकी कोरोना बाधित रुग्ण संख्या नोंदवणारा दिवस ठरला आहे. लोणावळा शहरात आज विविध विभागात मिळून ११ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच आजच्या दिवसात लोणावळा शहरातील एकूण करोना बधितांच्या संख्यने देखील शंभरी पार केली आहे. शहरात आतापर्यंत एकूण १०२ रुग्णांची नोंद झाली आहे.

लोणावळा शहरात आज शुक्रवारी वलवण मध्ये ६, प्रधान पार्क मध्ये १ आणि तुंगार्ली येथे १ असे ८ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यात अजून ३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात तुंगार्ली येथील एक २९ वर्षीय युवक, भांगरवाडी येथील एक ३७ वर्षीय व्यक्ती आणि खंडाळा येथील एक ६३ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा समावेश आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १०२ झाली आहे. यातील आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ५८ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ४ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०५】 

पांगोळी, वलवण  - १७【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १२】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - २२【बरे झालेले रुग्ण - १० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - १२】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - ०७【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०६】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०३】

गवळीवाडा  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०५】

खंडाळा  - १५【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - १०】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०३】

सह्याद्री नगर, हुडको - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages