लोणावळा येथील वलवण गावात ६ जणांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आज लोणावळा शहरात आढळून आलेल्या करोना बधितांची संख्या ८ झाली आहे. तर लोणावळा शहरातील एकूण बधितांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर पोचली असून ९९ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वलवण गावातील या सहाही रुग्णांच्या चाचण्या खाजगी लॅब मध्ये करण्यात आल्या होत्या. या सहा बधितांमध्ये एक ७० वर्षीय व दुसरा ४० वर्षीय अशा दोन व्यक्ती, एक १२ वर्षीय मुलगा आणि एक ६७ वर्षीय, दुसरी ६५ वर्षीय आणि तिसरी ४० वर्षीय अशा तीन महिलांचा समावेश आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या ९९ झाली आहे. यातील आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ५५ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ४ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
तुंगार्ली - ०४【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०४】
पांगोळी, वलवण - १७【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १२】
नांगरगाव - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】
भांगरवाडी - २१【बरे झालेले रुग्ण - १० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】
नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड - ०७【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०६】
रेल्वे विभाग, बारा बंगला - ०६【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०३】
गवळीवाडा - ०९【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०५】
खंडाळा - १४【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०९】
जुना खंडाळा, रायवूड - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】
लोणावळा गावठाण, बाजारपेठ - ०९【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०३】
सह्याद्री नगर, हुडको - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】

No comments:
Post a Comment