लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 10 August 2020

लोणावळा शहरातील कोरोना बधितांची संख्या १२५; गवळीवाडा विभागात तीन जण पॉझिटिव्ह


लोणावळा शहरातील गवळीवाडा विभागातील ३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता १२५ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा शहरातील गवळीवाडा विभागातील एकाच कुटुंबातील एक ५८ वर्षीय व्यक्ती, एक ५८ वर्षीय महिला आणि एक ३१ वर्षीय महिला असे तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून खाजगी रुग्णालयात त्यांची चाचणी घेण्यात आली होती. याशिवाय आज गवळीवाडा येथील एका रुग्णाला बरं वाटत असल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १२५ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ६६ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ५ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०५】 

पांगोळी, वलवण  - २१【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - १४】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - २४【बरे झालेले रुग्ण - १५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०९】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - १०【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०७】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ००】

गवळीवाडा  - १२【बरे झालेले रुग्ण - ०३ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०४】

खंडाळा  - १७【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - १२】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - १५【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०९】

सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】

भुशी, रामनगर - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


2 comments:

  1. Total count pan add karana, kiti bare zhale, kiti ajun hospital madhi ahet ani kiti mrut ahet.

    ReplyDelete
    Replies
    1. खाली जे आकडे दिलेत ते त्याचेच आहेत. एकूण रुग्ण किती. त्यातील किती बरे झालेत, किती मृत आहेत आणि शेवटचे सक्रिय म्हणजे दवाखान्यात उपचार घेणारे रुग्ण.. सर्व माहिती विभागवार आहे

      Delete

Post Top Ad

Your Ad Spot

Pages