लोणावळा येथील गवळीवाडा विभागातील एका ७० वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल आज शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीची चाचणी एका खाजगी रुग्णालयात घेण्यात आली होती.
आज करोना पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णासह आता गवळीवाडा विभागातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ७ झाली आहे. तर लोणावळा शहरातील एकूण रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. यापैकी आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३० आहे, तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३१ इतकी झाली आहे. याशिवाय चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे
गवळीवाडा - ७【बरे झालेले रुग्ण - १ / मृत्यू - २】
कोणार्क पॅरेडाईज, पांगोळी - ४【बरे झालेले रुग्ण - २ / मृत्यू - ०】
भांगरवाडी - १६【बरे झालेले रुग्ण - ८ / मृत्यू - ०】
नांगरगाव - ६【बरे झालेले रुग्ण - ६ / मृत्यू - ०】
खंडाळा (खंडाळा + जुना खंडाळा) - ११【बरे झालेले रुग्ण - ९ / मृत्यू - ०】
वलवण - २ 【बरे झालेले रुग्ण - १ / मृत्यू -१】
टेबल लँड, लोणावळा गावठाण, बाजारपेठ - ११【बरे झालेले रुग्ण - ३ / मृत्यू - ०】
रेल्वे विभाग - ६【बरे झालेले रुग्ण - ० / मृत्यू -१】
तुंगार्ली - २【बरे झालेले रुग्ण - ० / मृत्यू - ०】

No comments:
Post a Comment