लोणावळेकरांसाठी आजचा शनिवारचा दिवस दिलासादायक वृत्त देणारा ठरला आहे. लोणावळा शहरातून काल शुक्रवारी करोना तपासणी साठी पाठवण्यात आलेले तब्बल ४० जणांचे स्वॅब आज शनिवारी निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील करोना बधितांची संख्या सध्यातरी ६४ वर थबकली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी शुक्रवारी तब्बल ४० जणांचे स्वॅब करोना तपासणी साठी घेण्यात आले होते. त्यातील एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. असे असले तरीही सध्याचा करोनाचा फैलावता संसर्ग बघता लोणावळेकरांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

छान बातमी... मात्र काळजी घेणे जरुरी,
ReplyDelete