लोणावळा येथील कुणे ना.मा. याठिकाणी दोन पुरुष आणि दोन महिला आशा चार जणांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे कुणे ना.मा. गावात आता एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कुणे ना.मा. येथे गुरुवारी करोना बाधित आढळून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील व्यक्तींचे स्वॅब करोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्या चाचणी मध्ये ४२ वर्षीय आणि ५९ वर्षीय अशा दोन व्यक्तींसह ३९ वर्षीय आणि ५१ वर्षीय अशा दोन महिलांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. खोपोली याठिकाणी एका खाजगी लॅब मध्ये या चाचण्या घेण्यात आल्या असून कुणे गाव याठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती कार्ला आरोग्य आधिकारी डाॅ. भारती पोळ आणि आरोग्य सेवक गणेश तिकोणे यांनी दिली.

No comments:
Post a Comment