लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 31 July 2020

मटक्याच्या धंद्यावर लोणावळा पोलिसांचा छापा; दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

लोणावळा शहराच्या हददीमधील सिनीब्लिस निलकमल थिएटरचे बाजुस अवैधपणे सुरू असलेल्या एका मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकीत लोणावळा शहर पोलिसांनी ४६,४८० रुपये किमतीचे जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम जप्त केली. सोबतच दहा जणांच्या विरोधात मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा उपविभागीय अधिकारी, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना लोणावळा शहरातील दोन व्यक्ती आपल्या हस्तकाकरवी अवैधरित्या कल्याण नावाचा मटक्याचा अड्डा चालवत असल्याची बातमी मिळाली. या बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पो.नि.मनोजकुमार यादव यांच्या नेतृत्वात पो.उप.निरीक्षक मृगदीप गायकवाड, पो.ना. जी.बी. होले, पो.कॉ. एस.एम. वाडेकर, एस.डी. शिंदे, एस.एम. डोईफोडे, व्ही.एच. शिंदे यांच्या पथकाने दोन पंचासह वरील ठिकाणी छापा मारला. लोणावळा शहर पोलिसांनी याठिकाणी ४६,४८० रुपये किमतीचे जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम जप्त करीत १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पो.हवा.जयराज पाटणकर यांनी फिर्याद दाखल केली असून पो.उप.निरीक्षक मृगदीप गायकवाड हे पुढील तपास करीत आहे. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages