आज मंगळवारी लोणावळा शहरात कोविड महासर्वेक्षण अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये वेगवेगळ्या विभागातून ५३ जणांना कोरोना ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे शहरातील एकूण बधितांची संख्या ७९५ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज शहरात कोविड केअर सेन्टर झालावाडी येथे ८३, वागड सनेटेरियम येथे १३, भुशी रामनगर शाळा येथे ५८, संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे ४७, खंडाळा माध्यमिक विद्यालय येथे ६५ आणि शाळा क्रमांक एक येथे २८ अशा एकूण २९४ जणांचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात आले होते. त्यापैकी ५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये कोविड केअर सेन्टर झालावाडी येथील १७, वागड सनेटेरियम येथील ३, भुशी रामनगर शाळा येथील ३, संत ज्ञानेश्वर विद्यालय येथील १६, खंडाळा माध्यमिक विद्यालय येथील ८ तर शाळा क्रमांक एक येथील ६ जणांचा समावेश आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानंतर लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९५ झाली आहे. याशिवाय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या ३०९ झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत २७ झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ४५९ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर 9 )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment