काल सोमवारी उशिरा प्राप्त झालेल्या कोविड अहवालानुसार लोणावळा शहरात आणखी १६ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे शहरात एकूण बाधित रुग्णांची संख्या एकूण ७४२ इतकी झाली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार सोमवारी उशिरा अहवाल प्राप्त झालेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागातील ९, खंडाळा विभागातील ३, गवळीवाडा विभागातील २ तर बाजारपेठ आणि सिद्धार्थ नगर या दोन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण १६ जणांचा समावेश आहे.
लोणावळा शहरात आतापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४२ झाली आहे. याशिवाय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या ३०९ झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत २७ झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ४०६ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर 9 )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment