लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 14 September 2020

लोणावळा ७०० पार; लोणावळा शहरात ४१ नवे कोरोना रुग्ण

लोणावळा शहरात आज सोमवारी विविध विभागातून एकूण ४१ नवे रुग्ण आढळून आले आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांच्या संख्येने ७०० चा टप्पा पार केला असून शहरात आजमितीला एकूण ७२६ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. 

आज मिळालेल्या माहितीनुसार कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागातील १०, तुंगार्ली विभागातील ६, गवळीवाडा विभागातील ५, नांगरगाव विभागातील ३, बाजारपेठ विभागातील ३, वलवण विभागातील ३, 'जी' वॉर्ड विभागातील २ आणि पांगोळी, हुडको, अण्णाभाऊ साठे वसाहत, बारा बंगला, हनुमान टेकडी, खंडाळा, स्वराज्य नगर, खोंडगेवाडी, रायवूड इंदिरा नगर या ९ विभागातील प्रत्येकी १ आशा एकूण ४१ जणांचा समावेश आहे.

आज अखेर लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२६ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या ३०९ झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत २७ झाली आहे. सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ३९० इतकी आहे.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 9 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages