लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 14 September 2020

कोविड-१९ महासर्वेक्षण मोहिमेत सहभागी व्हा; सर्व पक्षीय नेत्यांचे लोणावळेकर जनतेला आवाहन

राज्य शासनाच्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या उपक्रमाच्या अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं मंगळवारी संपूर्ण लोणावळा शहरात कोविड-१९ महासर्वेक्षण अभियान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या महासर्वेक्षण अभियानाबाबत आपल्या मनात कोणताही किंतु परंतु न बाळगता, न घाबरता सर्व लोणावळेकर नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन लोणावळा शहरातील सर्व पक्षीय नेत्यांनी लोणावळेकर जनतेला केलं आहे.

मंगळवार १५ सप्टेंबर रोजी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं जे महासर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार आहे त्याबाबत माहिती देण्यासाठी लोणावळा नगरपरिषद कार्यालयात सर्वपक्षीय नेत्यांची, सर्व नगरसेवकांची तसेच शहरातील सर्व डॉक्टरांची बैठक बोलावण्यात आली होती. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि मुख्याधिकारी रवि पवार यांनी या बैठकीत महासर्वेक्षण अभियानाबाबतची सर्व माहिती तसेच त्यासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती या सर्वांना दिली. यावेळी या सर्व उपस्थित मान्यवरांकडून अभियानासंदर्भात आलेल्या सूचनांचा आदर करीत यातील योग्य सूचनांचा समावेश या अभियानात करून घेण्यात आला आहे. 

लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहात वेगवेगळ्या वेळेत घेण्यात आलेल्या या बैठकीला आरपीआय चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष मच्छिन्द्र खराडे, भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य यशवंत पायगुडे, शहर उपाध्यक्ष रवी पोटफोडे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, मनसेचे शहराध्यक्ष भरत चिकणे, शहर प्रवक्ते अमित भोसले, यांच्याशिवाय सर्व नगरसेवक, तसेच डॉ. शैलेश शहा, डॉ.परमार, डॉ. सीमा शिंदे, डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.चटर्जी आदींसह अनेक डॉक्टर उपस्थित होते.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 9 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages