लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 13 September 2020

लोणावळा शहरात ३५ नवे रुग्ण; शहरातील एकूण रुग्णसंख्या ६८५

लोणावळा शहरात आज रविवारी सकाळ पर्यंत प्राप्त झालेल्या माहिती नुसार लोणावळा शहरात ३५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामुळे शहरातील एकूण बधितांची संख्या आता ६८५ झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तुंगार्ली विभागातील ४, खोंडगेवाडी विभागातील ४, भुशी विभागातील ३, खंडाळा विभागातील ३, 'जी' वॉर्ड विभागातील ३, वलवण विभागातील २, पांगोळी विभागातील २, जुना खंडाळा विभागातील २, भांगरवाडी विभागातील २ याशिवाय लोणावळा बाजारपेठ, वर्धमान सोसायटी, अण्णाभाऊ साठे वसाहत, गावठाण आणि हनुमान टेकडी या सहा विभागातील प्रत्येकी १ तसेच पत्ता कन्फर्म न झालेले अन्य ५ जण अशा एकूण ३५ जणांचा समावेश आहे.

आज अखेर लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८५ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या २८३ झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत २५ झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ३७७ इतकी आहे.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 9 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages