लोणावळा शहरात आज गुरुवारी विविध विभागातून एकूण २३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८३१ इतकी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खंडाळा विभागातील ५, तुंगार्ली विभागातील ३, पांगोळी विभागातील २, भांगरवाडी विभागातील २, वलवण विभागातील २, नांगरगाव विभागातील २ तसेच
लोणावळा बाजारपेठ, जुना खंडाळा, गोल्डवॅली, गवळीवाडा, इंद्रायणी नगर, आगवाली चाळ आणि बारा बंगला या सात विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण २३ जनांचा समावेश आहे.
लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८३१ झाली आहे. याशिवाय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या ४२० झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत २९ झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ३८२ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर 9 )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment