लोणावळा शहरात आज शुक्रवारी विविध विभागातून एकूण १४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४५ इतकी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागातील ३, हनुमान टेकडी विभागात २, लोणावळा बाजारपेठ विभागात २, रामनगर विभागात २ याशिवाय खंडाळा, तुंगार्ली, हुडको, आगवाली चाळ आणि वलवण या ५ विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण १४ जनांचा समावेश आहे.
लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४५ झाली आहे. याशिवाय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या ४२० झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत २९ झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ३९६ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर 9 )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment