लोणावळा शहरात एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मृतांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. लोणावळा शहरातील सिद्धार्थ नगर येथील एका ७६ वर्षीय जेष्ठ महिलेचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. २९ ऑगस्ट रोजी सदर महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
लोणावळा शहरात कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १६ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आणि त्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या विचारात घेता अजूनही लोणावळा शहरातील मृत्यू दर हा ४.५०% पेक्षा अधिक आहे. मागील काही दिवसात झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि त्यातील मृत्यूचे प्रमाण बघता लोणावळेकरांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०७)
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment