लोणावळा शहरात आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी ३५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यातील ३२ जण रॅपिड अँटीजन चाचणी मध्ये पॉझिटिव्ह आले आहे. याशिवाय मागील २४ तासांमध्ये शहरातील दोन कोरोना बधितांचा मृत्यू देखील झाला आहे. एकूणच लोणावळा शहरात कोरोना ने आता विक्राळ रूप धारण करायला सुरुवात केली असून मागील ७ दिवसात शहरात तब्बल १४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकप्रकारे शहरात कोरोनाचा विस्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लोणावळा शहरातील नांगरगाव विभागात ७, रायवूड विभागात ६, गवळीवाडा विभागात ५, लोणावळा बाजार विभागात ४, वर्धमान इनक्लेव्ह येथे ३, जुना खंडाळा विभागात ३, खंडाळा विभागात २, भांगरवाडी विभागात २ आणि तुंगार्ली, रामनगर व वलवण विभागातील प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय लोणावळा शहरात आज दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लोणावळा शहरात आतापर्यंत कोरोना बधितांची एकूण संख्या ३८१ झाली आहे तर आतापर्यंत कोरोना वर मात केलेल्या १८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या १७ असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या १८४ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०७)
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment