लोणावळा शहरात आज गुरुवारी आणखी ४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तत्पूर्वी आज सायंकाळ पर्यंत ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आज कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या एकूण रुग्णांची संख्या ३९ इतकी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खोंडगेवाडी याठिकाणी ३ जणांचे तर भांगरवाडी येथील १ जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या ३८५ झाली आहे तर आतापर्यंत कोरोना वर मात केलेल्या १८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या १७ असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या १८९ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०७)
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment