लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 7 September 2020

लोणावळा शहरात ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

लोणावळा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली असून आज सोमवारी विविध विभागातील एकूण ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर नांगरगाव विभागातील एका ६८ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जुना खंडाळा विभागात सर्वाधिक ११ रुग्ण आढळून आले आहे. याशिवाय तुंगार्ली विभागात ६, भांगरवाडी विभागात २, नांगरगाव विभागात २, बारा बंगला विभागात २, खंडाळा विभागात २ आणि पांगोळी, हुडको, रामनगर, ठोंबरेवाडी व गवळीवाडा विभागात प्रत्येकी १ आशा एकूण ३० जणांचा समावेश आहे. 

लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६४ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या २२७ झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत २० झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या २१७ इतकी आहे.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर ८ )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages