लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 6 September 2020

मावळ तालुक्यातील ह्या दहा रुग्णालयांमध्ये केला जातो कोरोनावर उपचार; तिन ठिकाणी कोविड केअर सेंटर

मावळ तालुक्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेले कोरोना रुग्ण ही सर्वांसाठी चिंतेची बाब बनली आहे. तालुक्याचे तहसिलदार मधुसूदन बर्गे व आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वंयशिस्त पाळत खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मावळ तालुक्यात सध्या दहा रुग्णालयांमध्ये कोविड आजारावर उपचार केले जात असून शासकीय पातळीवर तीन ठिकाणी कोविड केअर सेंटर चालवली जात आहेत. याठिकाणी 544 बेडची व्यवस्था केली गेली आहे.

कोरोना रुग्णांसाठी मावळ तालुक्यातील दहा रुग्णालयांमध्ये मिळून 406 जनरल बेड, 219 आँक्सिजन बेड व 103 आयसीयू बेड आहेत. आयसीयू बेडमध्ये 39 बेड हे व्हेंटिलेटर युक्त असल्याची माहिती मावळ तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मावळ तालुक्यातील तळेगाव येथील सुगी पश्चात केंद्र याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून त्याठिकाणी 184 बेड, लोणावळ्यातील झालावाडी सेंटरमध्ये 60 बेड व समुद्रा इन्स्टिट्युट टाकवे येथे 300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांचे स्वँब घेण्यासोबत आयसोलेशन विभाग व सस्पेक्टेड विभाग करण्यात आला आहे. कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला मात्र कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांना आयसोलेशन विभागात ठेवण्यात येते तर त्यांच्या हाय रिस्क व लो रिस्क मधील व्यक्तींना सस्पेक्टेड विभागात ठेवले जाते.

मावळ तालुक्यातील कोविड रुग्णालये

1) मायमर रुग्णालय (तळेगाव दाभाडे)येथे कोरोना रुग्णांसाठी 298 जनरल बेड, 38 आँक्सिजन बेड व 20 आयसीयू बेड आहेत. आयसीयू मधील 12 बेडला व्हेंटिलेटर सपोर्ट आहेत. 

2) जनरल रुग्णालयात (तळेगाव दाभाडे)येथे कोरोना रुग्णांसाठी 26 जनरल बेड असून 26 आँक्सिजन बेड आहेत. तर आयसीयूचे 8 बेड असून त्यापैकी 2 बेडला व्हेंटिलेटर सपोर्ट आहे.

3) पायोनर रुग्णालयात (सोमाटणे फाटा)येथे कोरोना रुग्णांसाठी 25 जनरल बेड असून आँक्सिजन बेड 15 आहेत. तर 10 आयसीयू बेड असून यापैकी 4 बेडला व्हेंटिलेटरचा सपोर्ट आहे.

4) पवना हाॅस्पिटल (सोमाटणे) येथे कोरोना रुग्णांसाठी 25 जनरल बेड असून आँक्सिजन बेड 36 आहेत. तर 12 आयसीयू बेड असून यापैकी 6 बेडला व्हेंटिलेटरचा सपोर्ट आहे.

5) स्पर्श हाॅस्पिटल (सोमाटणे फाटा) येथे कोरोना रुग्णांसाठी जनरल बेड नसून आँक्सिजनचे 40 बेड आहेत. तर आयसीयूचे 25 बेड असून यापैकी 7 बेडला व्हेंटिलेटरचा सपोर्ट आहे.

6) ओम हाॅस्पिटल (सोमाटणे फाटा) येथे कोरोना रुग्णांसाठी 22 जनरल बेड आहेत. तर आयसीयूचे 7 बेड आहेत. एक व्हेंटिलेटर स्टँड बाय ठेवण्यात आला आहे.

7) बडे हाॅस्पिटल (कामशेत) येथे कोरोना रुग्णांसाठी 2 जनरल बेड असून आँक्सिजनचे 14 बेड आहेत. तर आयसीयूचे 9 बेड असून यापैकी 8 बेडला व्हेंटिलेटरचा सपोर्ट आहे.

8) कामशेत रुग्णालय (कामशेत) येथे कोरोना रुग्णांसाठी जनरल बेड नसून आँक्सिजनचे 22 बेड आहेत. तर आयसीयूचे 3 बेड असून कोणत्याही बेडला व्हेंटिलेटरचा सपोर्ट नाही.

9) संजीवनी रुग्णालय (लोणावळा) येथे कोरोना रुग्णांसाठी 2 जनरल बेड असून आँक्सिजनचे 16 बेड आहेत. तर आयसीयूचे 7 बेड असून दोन व्हेंटिलेटर स्टँड बाय आहेत.

10) श्री हाॅस्पिटल (वराळे) येथे कोरोना रुग्णांसाठी 6 जनरल बेड असून आँक्सिजनचे 14 बेड आहेत. तर आयसीयूचे 2 बेड आहेत.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असून कंटेन्मेंट झोनची कटाक्षाने अंमलबजावणी झाल्यास समुह संसर्ग कमी होऊ शकतो, याकरिता कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी अति महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच कोणाला घरी येऊ देऊ नये. यासह सार्वजनिक ठिकाणी जाताना चेहर्‍यावर मास्क लावणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अतिशय गरजेचे आहे.


(माहितीचा स्रोत : मावळ माझा)


व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर ८ )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages