लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 6 September 2020

लोणावळा शहरात आणखी ८ जणांना कोरोनाची लागण; एका रुग्णाचा मृत्यू


लोणावळा शहरात आज रविवारी आणखी ८ जणांना कोरोनाची लागण आहे. तत्पूर्वी आज ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आज शहरात कोरोना बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १३ झाली आहे. याशिवाय भांगरवाडी विभागातील एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जुना खंडाळा विभागात एक ४० वर्षीय, एक ४७ वर्षीय आणि एक ३३ वर्षीय महिला, एक १५ वर्षीय मुलगी, एक १६ वर्षीय मुलगा, आणि एक ३३ वर्षीय पुरुष असे एकूण ६ जण, वलवन येथील एक ४७ वर्षीय पुरुष तर भांगरवाडी येथील एक ७८ वर्षीय जेष्ठ पुरुष असे सर्व मिळून एकूण ८ जनांचा समावेश आहे. 

लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४३४ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या १९० झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत १९ झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या २२५ इतकी आहे.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर ८ )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages