लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 20 September 2020

लोणावळा शहरात आज १९ नवे कोरोना रुग्ण; बधितांची एकूण संख्या ८९६

लोणावळा शहरात आज रविवारी विविध विभागातून एकूण १९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९६ इतकी झाली आहे. याशिवाय एक रुग्ण दगावल्याची माहिती प्राप्त झाली असल्याने शहरातील कोरोना मुळे दगावलेल्यांची संख्या ३१ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खंडाळा विभागातील ४, वलवण विभागातील ३, भांगरवाडी विभागातील २, सिद्धार्थ नगर विभागातील २, नांगरगाव विभागातील २, गावठाण विभागात २ याशिवाय गवळीवाडा, न्यू तुंगार्ली, तुंगार्ली आणि बाजारपेठ या ४ विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण १९ जनांचा समावेश आहे.

लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९६ झाली आहे. याशिवाय रुग्णालयातून आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या ४८० झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत ३१ झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ३८४ इतकी आहे.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 9 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages