लोणावळा शहरात आज सोमवारी विविध विभागातून एकूण १३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. याशिवाय लोणावळा शहरातील ३ कोरोना बधित रुग्ण मागील ४८ तासात दगावले आहेत. त्यामुळे लोणावळा शहरातील कोरोना मुळे दगावलेल्यांची संख्या ३४ झाली आहे. तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१३ इतकी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये वलवण विभागातील ५, गवळीवाडा विभागातील ३ याशिवाय भांगरवाडी, न्यू तुंगार्ली, गावठाण, सिद्धार्थ नगर आणि बाजारपेठ या ५ विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण १३ जनांचा समावेश आहे.
लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१३ झाली आहे. याशिवाय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या ५१९ झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत ३४ झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ३५९ इतकी आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर 9 )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment