लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 22 September 2020

१००० पार लोणावळा; महासर्वेक्षणच्या दुसऱ्या टप्प्यात लोणावळा शहरात ६६ नवे कोरोना बाधित रुग्ण

लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला असून शहरातील एकूण बधितांची संख्या १००८ इतकी झाली आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं शहरातील भांगरवाडी, हनुमान टेकडी, सिद्धार्थ नगर, गावठाण, भुशी, रामनगर आणि खंडाळा या विभागामध्ये दुसऱ्या टप्प्यातील कोविड १९ महासर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत ६६ नवे रुग्ण आढळून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वर उल्लेखलेल्या विभागातील ६० वर्षावरील नागरिकांची तसेच लक्षणं असलेल्या एकूण ३९७ जणांची कोविड चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ३२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शहरातील एकूण चार स्वॅब सेन्टर वर या चाचण्या घेण्यात आल्या. यात कोविड केअर सेन्टर झालावाडी येथे ९५ स्वॅब घेण्यात आले, त्यातील २९ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. खंडाळा माध्यमिक विद्यालय येथे १३७ जणांचे स्वॅब घेण्यात आले, त्यातील २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. भुशी रामनगर येथे १०० जणांचे स्वॅब घेण्यात आले, त्यापैकी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर संत ज्ञानेश्वर विद्यालय, भांगरवाडी येथे ६५ जणांचे स्वॅब घेण्यात आले, त्यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय खाजगी लॅबमधून प्राप्त झालेल्या अहवालात ७ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आज मंगळवारी एकूण पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांची संख्या ७३ इतकी झाली आहे. 

या महासर्वेक्षण अभियानात नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि मुख्याधिकारी रवी पवार हे स्वतः ठिकठिकाणी फिरून लोकांना तपासणी साठी आवाहन करीत होते. तर देविदास कडू, पूजा गायकवाड, रचना सिनकर, कल्पना आखाडे, मंदा सोनवणे या त्या त्या विभागातील नगरसेवक, नगरसेविका लोकांना स्वॅब सेन्टर पर्यंत घेऊन येताना दिसत होते. 

एक हजार पार झालेली ही संख्या प्रत्येक लोणावळेकर नागरिकाला काळजी करायला लावणारी असून, एकप्रकारे नागरिकांनी यापुढे तरी सावध राहून स्वतःची काळजी घेणं आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश देणारी आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्यास जरून घराच्या बाहेर पडावं, मात्र मास्क चा आणि शक्य झाल्यास हॅन्डग्लोज वापर करावा, सोशल डिस्टनसिंग वर भर द्यावा असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मुख्याधिकारी रवी पवार यांनी लोणावळेकर नागरिकांना केले आहे. 


व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 9 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages