लोणावळा शहरात १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १०२१ इतकी झाली आहे. याशिवाय तुंगार्ली येथील रहिवासी असलेल्या एका ४३ वर्षीय कोरोना बधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने शहरातील एकूण मृतांची संख्या ३७ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज लोणावळा नगरपरिषदेच्या कोविड केअर सेन्टर, झालावाडी याठिकाणी घेण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये केवळ २ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर खाजगी लॅब मधून प्राप्त झालेल्या अहवालामधील ११ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.
शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण वरील छायाचित्र बघू शकता.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा ( ग्रुप नंबर 9 )
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:
Post a Comment